Entertainment : सध्या शाहीद कपूर व मृणाल ठाकूर हे त्यांचा आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. संपूर्ण देशात या चित्रपटाची खूप आतुरता चाहत्यांमध्ये दिसत आहे. परंतु कोरोना च्या पार्श्वभूमी पाहता हा चित्रपटासाठी धोक्याची घंटा निर्माण होताना दिसत आहे.,कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हा चित्रपट येत्या ३१ डिसेंबर ला सर्व देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. दिल्ली सरकारने मंगळवारी राज्यातील थिएटर, जिम व शाळा बंद केल्या आहेत. म्हणून या चित्रपटासाठी आपल्याला थोडीशी वाट पहावी लागणार आहे. या मुळे प्रेक्षकान मध्ये खूप नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर्सी हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो या साठी खूप विलंब होऊ शकतो.
Read More :
- दिवाळीत फटके वाजवताय सावधान डोळ्यांना होऊ शकतो धोका !
- पुनीत राजकुमार यांच्या मृतुनंतर या चार व्यक्तींना झाला खूप मोठा फायदा | मिळाले डोळे ..