पुनीत राजकुमार यांच्या मृतुनंतर या चार व्यक्तींना झाला खूप मोठा फायदा | मिळाले डोळे ...

पुनीत राजकुमार यांच्या मृतुनंतर या चार व्यक्तींना झाला खूप मोठा फायदा | मिळाले डोळे ...

puneet rajkumar death

News : कन्नड चित्रपटातील कलाकार पुनीत राजकुमार (वय ४६) यांनी श्वसनक्रिया बंद ( हार्ट अंटक) पडल्याने चित्रपटश्रुष्टी व आपल्या चाहत्यांचा निरोप घेतला. गेल्या शुक्रवारी सकाळी व्यायाम केंद्रात सराव करत असताना त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा एक मोठा बिघाड जालेला जाणवला. त्यानंतर त्यांना बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांकडून कळवण्यात आले कि त्यांची प्राणज्योत मावळी आहे. परंतु पुनीत राजकुमार यांनी जाता जाता हि सत्कर्म करून गेले त्यांच्या कार्यामुळे जवळ जवळ ४ व्यक्तींना त्यांच्या नेत्रदानामुळे नेत्रदृष्टी मिळाली. त्यांच्या निधनानंतर हि त्याचे मदतीचे हात थांबले नाही. त्यांच्या घरच्यांनी त्यांचे डोळे दान करायचे ठरवले. सहा तासाच्या कालावधीत हि प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यांच्या या निर्णयामुळे १ महिला आणि ३ पुरुष वर्गास डोळे मिळाले आहे.

हे पेशंट गेल्या ६ महिन्या पासून डोळ्यांच्या प्रेतीक्षेत वेटिंगवर होते. या पेशंटचे वय साधारण पंचवीस ते तीस असल्याचे समजते. हि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी आनंदाची बातमी होती. मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणा त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घेतली होती.


पुनीत कुमारयांनी याआधी सुधा सामाजिक कार्यात खूप हातभार लावला आहे. त्यांना चित्रपटा सोबतचं समाज कार्याची आवड हि पहिल्या पासूनच होती. त्यांच्या हातून आता परियंत अफाट अस समाज कार्य घडलं आहे. 

पुनीत राजकुमार यांच्या समाजकार्याचा एक आढावा.

१८०० मुलांचे फ्री शिक्षण 

४५ फ्री शाळा 

१९ गोशाला

१६ वृद्धाश्रम 

२६ अनाथ आश्रम 

तसेच म्हैसूरमध्ये शक्ती धाम नावाचे मुलीसाठी शिक्षण ववस्था सुरु केल्या. तसेच प्रेक्षकान मध्ये जागृती व्यावी म्हणून त्यांनी मोफत काही चित्रीकरण हि केले . 

परंतु या दरम्यान आपला लोकप्रिय कलाकार आपल्याला सोडून गेल्याने कन्नड चित्रपट जगतात मोठी शोककळा पसरली . पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी येताच त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धका बसला . त्यातच आपला लाडका अभिनेता आपल्याला सोडून गेल्याच्या धाक्यामध्ये काहीनी आत्महत्या केल्या तर काहींना हार्ट अटक आला. या मुळे काहीच मृतु हि झाला.


Read More : 

 नवरात्रीतील नऊ रंगांचे विशेष महत्व आणि देवीची नऊ रूपे वाचा सविस्तर...

नवरात्रीतील नऊ रंगांचे विशेष महत्व आणि देवीची नऊ रूपे वाचा सविस्तर...

 


Pune : हिंदू लोकांसाठी नवरात्री हा एक आनंदी व आशादायक उत्सव आहे. भारत तसेच असंख्य देशांमध्ये हा उत्सव आनंदात साजरा केला जातो. नवरात्रीचा उत्सव हा नऊ दिवसा करता अगदी कौतुकाने साजरा केला जातो.ज्यात भक्त प्रेमाने दुर्गा देवीची नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. हा उत्सव मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

या वर्षी नवरात्र हा सण सात ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत  साजरा केला जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विविध रंग असतात जे देवीला समर्पित केले जातात. या नऊ दिवसांसाठी नऊ रंग अत्यावश्यक आहेत. 

जाणून घ्या या नऊ रंगांचे विशेष महत्व व कोणत्या दिवशी कोणता रंग देवेला अर्पण केला जाईल. खालील प्रमाने,

नवरात्री दिवस १ : रंग पिवळा

पहिल्या दिवशी आपण पिवळा रंग घालावा. या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी शेलपुत्रीची पूज्या करावी तसेच देवीला पिवळा रंग व लाल वस्त्र परिधान करून पांढरे फुल अर्पण कारावे. देवी चे हे पहिले रूप मानले जाते.पिवळा रंग आनंद आणि उत्साह चे प्रतिक आहे.

 

नवरात्री दिवस २ : रंग हिरवा

दुसऱ्या  दिवशी आपण हिरवा रंग घालावा. या दिवशी आई ब्राम्ह्चारणी ची पूज्य करावी तसेच तिला हिरवा व नारंगी वस्त्र घालून हिरव्या रंगाचे फुले, पाने देवी ला अर्पण करावी. आईचे हे दुसरे रूप मानले जाते. हिरवा रंग समृद्धी चे प्रतिक आहे. 


नवरात्री दिवस ३ : रंग राखाडी

तिसऱ्या दिवशी आपण राखाडी रंग घालावा. या दिवशी आई चंद्रघंटा देवीची पूजा करावी तसेच देवीला राखाडी रंग परिधान करून शंखपुष्पिची फुले देवी ला अर्पण करावी. हे आईचे तिसरे रूप मानले जाते. राखाडी रंग हे सूक्ष्मतेचे प्रतिक आहे.

  

नवरात्री दिवस ४ : रंग नारंगी 

चौथ्या दिवशी आपण नारंगी रंग घालावा. या दिवशी आई कुष्मांडा’ची पूजा करावी तसेच देवीला नारंगी व लाल वस्त्र परिधान करून देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. हे आई चौथे रूप मानले जाते. नारंगी रंग हा उन्हाळ्याचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ५ : रंग पांढरा  

पाचव्या दिवशी आपण पांढरा रंग घालावा. या दिवशी आई स्कंदमाता ची पूज्या करावी तसेच देवीला पांढरा व क्रीम कलर चे वस्त्र परिधान करून देवीला पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावी. हे आई चे पाचवे रूप मानले जाते.पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ६ : रंग लाल 

सहाव्या दिवशी आपण लाल रंग घालावा. या दिवशी आई कात्यायनी ची पूजा करावी तसेच देवीला लाल व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावी. हे आई चे सहावे रूप मानले जाते. लाल रंग हा आरोग्य, अनंत धर्या व आरोग्याचे प्रतिक आहे. 


नवरात्री दिवस ७ : रंग रॉयल ब्लू

सातव्या  दिवशी आपण रॉयल ब्लू रंग घालावा. या दिवशी आई कालरात्रीची ची पूजा करावी तसेच देवीला लाल व निळ्या रंगाचे वस्त्र परिदान करून निळ्या रंगाची फुले अर्पण करावी. हे आईचे सातवे रूप मानले जाते. रोयल ब्लु हा रंग उत्तम अरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 


नवरात्री दिवस ८ : रंग गुलाबी

आठव्या दिवशी आपण गुलाबी रंग घालावा.या दिवशी आई महागौरीची पूजा करावी तसेच देवीला मोरपंखी वस्त्र परिधान करून लाल ,गुलाबी,मोरपंखी फुले अर्पण करावी. हे आईचे आठवे रूप मानले जाते. गुलाबी रंग प्रेम व आपुलकीचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ९  : रंग जांभळा

नव्या दिवशी आपण जांभळा रंग घालावा. या दिवसी आई सिद्धीदात्रीची पूजा करावी तसेच देवीला जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून  जास्वंद फुल अर्पण करावे. हे आई चे नवे रूप म्हणून ओळखले जाते. जांभळा रंग उर्जा व चैतन्य चे प्रतिक आहे.

Read More :

पुण्यातील धकक्कदायक प्रकार, महेश पायगुडे चा मृतदेह सापडला या ठिकाणी,फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर

पुण्यातील धकक्कदायक प्रकार, महेश पायगुडे चा मृतदेह सापडला या ठिकाणी,फोटोवर क्लिक करून वाचा सविस्तर



 पुणे न्यूज: पुण्यातील धक्कादायक बातमी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी   (पुणे क्राईम न्यूज) यांच्या कडून समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील सुरक्षित वाहनात मृतदेह सापडल्याने काही खळबळ उडाली आहे. कालबाह्य झालेल्या व्यक्तीची पडताळणी केल्या नंतर असे समोर आले कि ती व्यक्ती महेश लक्ष्मण पायगुडे म्हणून ओळखली गेली आहे. पुणे क्राईम वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांनी सूचित केल्याप्रमाणे, मृत व्यक्ती महेश पायगुडे बराच कालावधी  पासून अनुपस्थित होता. त्याच्या कुटुंबाने फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्याकडे संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी नव्हता.तरी देखील, महेश पायगुडे बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळवण्यात आले नाही.

 हे आहे पुणे :  काही वेळापूर्वी महेश पायगुडे यांचा मृतदेह चारचाकीमध्ये सापडला होता. त्यानंतर या भागात हळहळ व्यक्त होत आहे. महेश पायगुडेचा मृतदेह गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहनात असावा असा अंदाज बांधला जात आहे.

 महेशचा मृतदेह पोलीस संरक्षणामध्ये घेऊन सांगवी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या टक्केवारीत दिवसेन दिवस वाढ होताना दिसत आहे तरी आजूबाजूच्या परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. 

वाढत्या गुन्हेगारि प्रकारामुळे काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एका दुचाकीला आग लावण्यात आली होती. कारण पिंपरी चिंचवड मधील एका मजुराने कामाचा मोबदला न दिल्या कारणमुळे त्याच्या मालकाची बाईक बाहेर जाळली होती. (पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी वाहन गायब झाले होते ) मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार  पिंपरी-चिंचवड शहरात घडला आहे. अंकित शिशुपाल यादव असे दुचाकी पेटवणाऱ्या मजुराचे नाव आहे. अंकित यादव हा उत्तर प्रदेशचा स्थानिक असून त्याने मांजरी येथे गणेश उंद्रे पाटीलसाठी काम केले.

Read More :

नवरात्री मधील घटस्थापनेची मांडणी, मुहूर्त, साहित्य, पूजेचे विधी व महत्त्व जाणुन घ्या सविस्तर...

नवरात्री मधील घटस्थापनेची मांडणी, मुहूर्त, साहित्य, पूजेचे विधी व महत्त्व जाणुन घ्या सविस्तर...



 7 ऑक्टोबर 2021 या दिवशी घटस्थापना होणार आहे. नवरात्री चे  दिवस (गुरुवार) पासून सुरू होणार आहे आणि 15 ऑक्टोबर (शुक्रवार) या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच तो दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो हा एक महत्त्वपूर्ण हिंदू उत्सव आहे जो भारत देशात विविध ठिकाणी साजरा केला जातो आणि आपल्या घरात विविध प्रकारे देवी दुर्गाचे स्वरूप उमटवतो. 

देवी दुर्गा, अन्यथा देवी काली यांना शक्तीचे प्रतीक म्हटले जाते ते स्त्री शक्ती आणि मुक्ती संबोधतात. कलश स्थापना किंवा घटस्थापना ही मुख्य प्रथा आहे कारण ती नवरात्रीची सुरुवात दर्शवते. 

नवरात्रीच्या सोबतच्या 9 दिवसांमध्ये, दुर्गा-शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ प्रकारच्या देवींना पवित्र ग्रंथात नमूद केलेले आहे याचे स्वर्गीय कायद्यानुसार पालन केले पाहिजे.

नवरात्रीच्या मुख्य दिवशी घटस्थापना पूर्ण होते. देवी दुर्गाला साद घालण्याचा आणि प्रथेसाठी योग्य मुहूर्त जाणून घेण्याचा हा एक दृष्टिकोन आहे. 

घटस्थापना मुहूर्त गुरुवार,दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 06 वाजून 16 मिनिटे 48 सेकंदा पासून सुरू होईल आणि सायंकाळी 07 वाजून 06 मिनिटे 52 सेकंद पर्यंत आहे. तर, अभिजीत मुहूर्त सकाळी 11.22 ते 12.09 पर्यंत असेल. 

नवरात्रीच्या मुख्य दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, ईशान्य कोपऱ्यात मुहूर्तानुसार येथे घटस्थापना केली पाहिजे. घटस्थापनेच्या वेळी, मातीमध्ये सात  प्रकारचे धान्य  मिक्स करून परडीच्या भांड्यात भरावे , नंतर, त्या वेळी, एक कलश पाण्याने भरून घ्यावे आणि लाल व पिवळ्या रंगाचा धागा त्या कळसाला बांधून घ्यावा. मग, त्या ठिकाणी, कलशांच्या वर पाने ठेवा आणि त्यावर नारळ ठेवा. व नागिनीच्या पानांची माळ करून त्या कलशावर बांधावी अशा प्रकारे कलश पूजन करा आणि नंतर गणेश वंदनेनंतर देवीला प्रसन्न करा.

घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यात रुंद तोंडाचे मातीचे भांडे, सात धान्य, कलश, स्वर्गीय माती, गुंतागुंतीचे नारळ, पाणी, आंबा किंवा अशोकाची पाने, लाल कापड, सुपारी, मोहोर आणि संपूर्ण तांदूळ 

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, सिंदूर, कपूर, जनु, उदबत्ती, निरंजन, पूजा पान, हर-फूल, पंचामृत, गुर खोपरा, खरिक, बदाम, नाणी, पाच प्रकारची फळे, चौकी पट, कुश आसन, आणि नैवेद्य. 

नवरात्री शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 06:21:56 नंतर संपन्न होईल तो दिवस लोक दसरा म्हणून साजरा करतात.दसऱ्याच्या दिवस हा अतिशय शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी घरात गोडाचे पदार्थ करतात सायंकाळी आपट्याची पाने एकमेकांना देऊन दसऱ्याच्या शुभेछ्या देतात आशा प्रकारे दिवरात्री साजरी केली जाते.

आता सोन्याची खरेदी करता येईल फक्त १०० रुपयात पाहा सविस्तर...

आता सोन्याची खरेदी करता येईल फक्त १०० रुपयात पाहा सविस्तर...


 

सोन्याची आवड़ असलेल्या व्यक्तिना लवकरच करायला मिळणार सोने खरेदी,त्या करिता वाचा शेवट पर्यन्त  ओरिजिनल सोने कमी किमतीत किंवा आपल्याला जमेल त्या पद्धतीने सोन्याच्या पैशाची परतफेड कशी करावी जाणुन  घ्या सविस्तर . 


कोरोनाच्या वाढत्या महामारि मध्ये सोन्याचे भाव हे अगदी गगनाला भिडले होते. कोरोनाच्या वाढत्या काळात सराफांची दुकाने बंद होती त्यामुळे सोने खरेदी करने फारच अवघड झाले होते. लग्नकार्य सोहळा असेल तरी सोने कसे खरेदी करावे हे प्रश्न सर्वांना पडत असेल त्यात पैशाचे अनेक प्रोब्लेम असतात. 

म्हणून टाटा समूहाचे प्रमुख तनिष्क यांनी ठरवले असे काही करायचे की लोकांना अगदी कमी किमतीत सोने खरेदी करता येईल.  म्हणूनच त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांशी  बोलने केले त्यात कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड, सेन्को गोल्ड आणि डायमंड्स या कंपन्यांनी ऑनलाइन पद्धतीने सोने विक्रीची ऑफर सुरू केली आहे, अशी माहिती ब्लूमबर्ग डॉट कॉम या द्वारे दिली आहे.  त्यात फ़क्त १०० रूपये इन्वेस्ट करुण सोन्याची खरेदी करता आली तर ..?  असे होणार आहे. पुढील काही काळात ज्वेलर्स ऑनलाइन पद्धतीने १०० रुपये पासून सोन्याची खरेदी सुरु करणार आहेत.



कोरोनाच्या वाढत्या महामारीत ज्वेलर्स बंद असल्यामुळे सरफानचे अधिकाधिक नुकसान झाले.त्यामुळे १०० रुपये भरून ऑनलाइन पद्धतिने सोने बुक करुण घेऊ शकता विशेषत: ग्राहक ज्वेलर्स मधे न जाता ऑनलाइन पद्धतिने सोने खरेदी करत आहेत. आपल्या भारत देशात काही दिवसांनी ऑनलाइन म्हणजेच डिजिटल खरेदीचे प्रमाण वाढताना दिसणार आहे. यात ग्राहक किमान एक ग्रॅम सोने खरेदी केल्यानंतर सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकतात. एका ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ४,५०० रुपये इतकी आहे

तारक मेहता का उल्टा चशमा मधील नट्टू काका यांचे या आजाराने झाले दुःखद निधन..

तारक मेहता का उल्टा चशमा मधील नट्टू काका यांचे या आजाराने झाले दुःखद निधन..

 

nattukaka-tarakhmehatakaultachasma-sonysub

सोनी सब वरील सर्वांची आवडती मालिका तारक मेहता का उल्टा चशमा मधील घनशाम नायक म्हणजेच सर्वांचे  आवडते विनोदी कलाकार नट्टू काका यांचे कॅन्सर या आजारामुळे झाले दुःखद निधन. घनशाम नायक हे गेल्या काही महिन्यांन पासून म्हणजेच लॉकडाउन नंतर अचानक मालिकेतुन नाहीसे झाले. कारण अचानक त्यांना कॅन्सरचा त्रास होउ लागला होता. दिवसेन दिवस त्यांचा त्रास वाढत गेला होता. तरी यांनी वयाच्या  ७७ राव्या वर्षी घेतला जगाचा निरोप. 


तारक मेहता का उल्टा चशमा मध्ये जेठालाल यांच्या दुकाना मध्ये सर्व देखरेखीचे काम करण्याची भूमिका साकारत असलेले अभिनेते नट्टू काका हे सर्वांचेच नेहमी त्यांच्या विनोदी अभिनयाने आणि तोड़के मोड़के  इंग्रजी बोलन्यातुन मनोरंजन करायचे. तसेच नट्टू काका हे तारक मेहता का उल्टा चशमा मधील गोकुलधाम परिवाराचे  हि आवडते अभिनेते होते. 


घनशाम नायक यांना वयाच्या 63 व्या वर्षी तारक मेहता का उल्टा चशमा या मालिकेत नट्टू काका यांची भूमिका सकारण्यास मिळाली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना कॅन्सर असल्याचे समजले. घनशाम हे अचानक शो मधून नाहीसे झालेले त्यांच्या चाहत्यांना कळून आले. तिथुन पुढे त्यांचे कॅन्सरचे उपचार सुरु झाले. गेल्या वर्षी सेप्टेंबर मध्ये त्यांच्या घशातुन कॅन्सरच्या ८ गाठी काढण्यात आल्या त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अशी अपेक्षा होती कि त्यांनी शो मध्ये पुन्हा परतावे. परंतु घनशाम यांची प्रकृति खालावत गेल्याने नट्टू काका शो मध्ये पुन्हा परतु शकले नाही. 


तारक मेहता का उल्टा चशमाची पूर्ण टीम व निर्माते असिम मोदी,तसेच त्यांचे चाहतेही  नट्टू काकांच्या निधनाने भावुक झाले. आज वयाच्या ७७ राव्या वर्षी अखेर घनशाम नायक यांनी जगाचा निरोप घेतला