नवरात्रीतील नऊ रंगांचे विशेष महत्व आणि देवीची नऊ रूपे वाचा सविस्तर...

 


Pune : हिंदू लोकांसाठी नवरात्री हा एक आनंदी व आशादायक उत्सव आहे. भारत तसेच असंख्य देशांमध्ये हा उत्सव आनंदात साजरा केला जातो. नवरात्रीचा उत्सव हा नऊ दिवसा करता अगदी कौतुकाने साजरा केला जातो.ज्यात भक्त प्रेमाने दुर्गा देवीची नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. हा उत्सव मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

या वर्षी नवरात्र हा सण सात ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंत  साजरा केला जाईल. हा उत्सव नऊ दिवसांचा सर्वात मोठा उत्सव आहे. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी विविध रंग असतात जे देवीला समर्पित केले जातात. या नऊ दिवसांसाठी नऊ रंग अत्यावश्यक आहेत. 

जाणून घ्या या नऊ रंगांचे विशेष महत्व व कोणत्या दिवशी कोणता रंग देवेला अर्पण केला जाईल. खालील प्रमाने,

नवरात्री दिवस १ : रंग पिवळा

पहिल्या दिवशी आपण पिवळा रंग घालावा. या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्या देवी शेलपुत्रीची पूज्या करावी तसेच देवीला पिवळा रंग व लाल वस्त्र परिधान करून पांढरे फुल अर्पण कारावे. देवी चे हे पहिले रूप मानले जाते.पिवळा रंग आनंद आणि उत्साह चे प्रतिक आहे.

 

नवरात्री दिवस २ : रंग हिरवा

दुसऱ्या  दिवशी आपण हिरवा रंग घालावा. या दिवशी आई ब्राम्ह्चारणी ची पूज्य करावी तसेच तिला हिरवा व नारंगी वस्त्र घालून हिरव्या रंगाचे फुले, पाने देवी ला अर्पण करावी. आईचे हे दुसरे रूप मानले जाते. हिरवा रंग समृद्धी चे प्रतिक आहे. 


नवरात्री दिवस ३ : रंग राखाडी

तिसऱ्या दिवशी आपण राखाडी रंग घालावा. या दिवशी आई चंद्रघंटा देवीची पूजा करावी तसेच देवीला राखाडी रंग परिधान करून शंखपुष्पिची फुले देवी ला अर्पण करावी. हे आईचे तिसरे रूप मानले जाते. राखाडी रंग हे सूक्ष्मतेचे प्रतिक आहे.

  

नवरात्री दिवस ४ : रंग नारंगी 

चौथ्या दिवशी आपण नारंगी रंग घालावा. या दिवशी आई कुष्मांडा’ची पूजा करावी तसेच देवीला नारंगी व लाल वस्त्र परिधान करून देवीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी. हे आई चौथे रूप मानले जाते. नारंगी रंग हा उन्हाळ्याचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ५ : रंग पांढरा  

पाचव्या दिवशी आपण पांढरा रंग घालावा. या दिवशी आई स्कंदमाता ची पूज्या करावी तसेच देवीला पांढरा व क्रीम कलर चे वस्त्र परिधान करून देवीला पिवळ्या रंगाचे फुल अर्पण करावी. हे आई चे पाचवे रूप मानले जाते.पांढरा रंग हा शुद्धतेचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ६ : रंग लाल 

सहाव्या दिवशी आपण लाल रंग घालावा. या दिवशी आई कात्यायनी ची पूजा करावी तसेच देवीला लाल व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावी. हे आई चे सहावे रूप मानले जाते. लाल रंग हा आरोग्य, अनंत धर्या व आरोग्याचे प्रतिक आहे. 


नवरात्री दिवस ७ : रंग रॉयल ब्लू

सातव्या  दिवशी आपण रॉयल ब्लू रंग घालावा. या दिवशी आई कालरात्रीची ची पूजा करावी तसेच देवीला लाल व निळ्या रंगाचे वस्त्र परिदान करून निळ्या रंगाची फुले अर्पण करावी. हे आईचे सातवे रूप मानले जाते. रोयल ब्लु हा रंग उत्तम अरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 


नवरात्री दिवस ८ : रंग गुलाबी

आठव्या दिवशी आपण गुलाबी रंग घालावा.या दिवशी आई महागौरीची पूजा करावी तसेच देवीला मोरपंखी वस्त्र परिधान करून लाल ,गुलाबी,मोरपंखी फुले अर्पण करावी. हे आईचे आठवे रूप मानले जाते. गुलाबी रंग प्रेम व आपुलकीचे प्रतिक आहे.


नवरात्री दिवस ९  : रंग जांभळा

नव्या दिवशी आपण जांभळा रंग घालावा. या दिवसी आई सिद्धीदात्रीची पूजा करावी तसेच देवीला जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून  जास्वंद फुल अर्पण करावे. हे आई चे नवे रूप म्हणून ओळखले जाते. जांभळा रंग उर्जा व चैतन्य चे प्रतिक आहे.

Read More :

Related Posts