आयुष्मान खुराना यांनी आपला आगामी चित्रपट, Action Hero याची घोषणा आज, 9 ऑक्टोबर रोजी टीझरसह केली. अभिनेत्याने खुलासा केला की चित्रपट 2022 मध्ये रिलीज होईल. आनंद एल रॉय आणि भूषण कुमार निर्मित या चित्रपटात आयुष्मान एक भूमिका करताना दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुरुद्ध अय्यर करणार आहेत.
आता पर्यंत विविध भूमिका साकारून बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यात आयुष्मान यांच्या वाट्याला फक्त रोमॅण्टिक तर कधी विनोदी भूमिकांचं आल्या, पण आता ते आपल्याला हटके भूमिकेत पाहायला मिळतील.
फेमस बॉलीवूड ॲक्टर आयुष्मान खुराना हे टी-सिरीज आणि कलर-येलो प्रोडक्शन यांचा आगामी चित्रपट Action Hero सर्वांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ॲक्टर आयुष्मान खुराना महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.यात एका अक्टरचा लेन्स समोरील आणि लेन्स माघील भूमिकेतील फरक आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.आयुष्मानाने देखील आपल्या सोसियल अकाऊंटवरून चित्रपटाचा टीझर सर्वान समोर आणला असून हा टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो. भांडता येत नाही." आयुष्मानच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतीसाध मिळताना दिसत आहे.
खुराना म्हणाले अक्शन हेरो हि पटकथा मला एकदम आवडली आहे. मला आशा आहे कि हा चित्रपट जगभरात प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा व रेकोर्ड करून जाणारा चित्रपट ठरेल.
या आधी आपण आयुष्मान खुराना यांना विकी डोनर, गुलाबो सिताबो , बाला , ड्रीम गिर्ल अश्या अनेक चित्रपटातून भेटलो आहे.
Read More :