नवरात्रीच्या उपवासादरम्यान या ५ टिप्समुळे होईल, तुमचे वजन कमी वाचा सविस्तर...



Lifestyle, 08 ऑक्टोबर 2021: परंपरा आणि सण,त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभज्य भाग आहे. देशभरात नवरात्री सुरु झाली कि उपवास हा भारतीय संस्कृती नुसार  केला जातो. या शुभ प्रसंगी लोक उपवासाचे सेवन करतात. जर तुमचे पोट बाहेर असेल तर या नवरात्रीच्या व्रतामध्ये तुम्ही अगदी जलद गतीने व सहज रित्या वजन कमी करू शकता.

कारण, विज्ञान देखील वजन कमी करण्यासाठी उपवास उपयुक्त मानते, जे शरीरातून निर्जंतुक पधार्थ  काढून टाकण्याची आणि शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेत मदत करते. उपवास करताना पोटाची चरबी कमी करण्यासाठी या ५  टिप्स चा अवलंब तुम्ही करू शकता.

जाणून घ्या अश्या सोप्या ५ टिप्स याने तुमचे पोट कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या उपवासादरम्यान हे काम अगदी सहजपणे केले जाऊ शकते. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये फक्त नऊ दिवसांत फरक पाहू शकता.या नऊ दिवसाच्या काळात उपवासात शक्य तितकी ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा. हे पदार्थ हलके व सहज पचणारे आहेत आणि चरबी वगळता सर्व पोषक तत्त्वे देतात.



जेवण करताना जास्त खाणे टाळा. फक्त थोड्या प्रमाणात जेवणे व पोष्टिक आहार घेणे शरीरासाठी खूप लाभदाही ठरेल. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहील व मधुमेह चा त्रासही नियंत्रणात राहील. नवरात्रीच्या उपवासादरम्यान,वरईच्या  पिठापासून बनवलेली भाकरी, पोळी  एकदा किंवा दोनदा खावी. वरईच्या पिठामध्ये असलेले फायबर तुमचे पोट दीर्घकाळ भरते आणि कमी कॅलरीज देखील पुरवते. यापेक्षा जास्त तळलेले अन्न खाऊ नका.

उपवास करताना, शरीराला निर्जलीकरणापासून वाचवण्यासाठी पुरेसे पाणी प्या. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करेल आणि हायड्रेशन वजन कमी करण्यास देखील मदत करेल.नवरात्रीचा उपवास याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्यायाम करणे बंद करा.होय, तुम्ही जड व्यायामाऐवजी हलका व्यायाम किंवा योगा करू शकता. हे पचनक्रिया जलद ठेवेल आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करेल. 

नवरात्रीचा उपवासचा  खरा अर्थ पोटाला आराम देणे हा आहे. किंबहुना तसे न होता उपवासाच्या दिवशी नवनवीन पदार्थ त्याहून जास्त खाण्याकडे कल असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उपवास जास्तीत जास्त आरोग्यदायी होईल या कडे लक्ष देण्याची गरज आहे. 

जास्त  वेळ अनोश्या पोटी राहून उपवास केल्याने पित्त वाढते. त्यामुळे अशा पद्धतीने उपवास करणे टाळावे. याने शरीराला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.  ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहते व तसेच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.


Read More :

Related Posts