तारक मेहता का उल्टा चशमा मधील नट्टू काका यांचे या आजाराने झाले दुःखद निधन..

 

nattukaka-tarakhmehatakaultachasma-sonysub

सोनी सब वरील सर्वांची आवडती मालिका तारक मेहता का उल्टा चशमा मधील घनशाम नायक म्हणजेच सर्वांचे  आवडते विनोदी कलाकार नट्टू काका यांचे कॅन्सर या आजारामुळे झाले दुःखद निधन. घनशाम नायक हे गेल्या काही महिन्यांन पासून म्हणजेच लॉकडाउन नंतर अचानक मालिकेतुन नाहीसे झाले. कारण अचानक त्यांना कॅन्सरचा त्रास होउ लागला होता. दिवसेन दिवस त्यांचा त्रास वाढत गेला होता. तरी यांनी वयाच्या  ७७ राव्या वर्षी घेतला जगाचा निरोप. 


तारक मेहता का उल्टा चशमा मध्ये जेठालाल यांच्या दुकाना मध्ये सर्व देखरेखीचे काम करण्याची भूमिका साकारत असलेले अभिनेते नट्टू काका हे सर्वांचेच नेहमी त्यांच्या विनोदी अभिनयाने आणि तोड़के मोड़के  इंग्रजी बोलन्यातुन मनोरंजन करायचे. तसेच नट्टू काका हे तारक मेहता का उल्टा चशमा मधील गोकुलधाम परिवाराचे  हि आवडते अभिनेते होते. 


घनशाम नायक यांना वयाच्या 63 व्या वर्षी तारक मेहता का उल्टा चशमा या मालिकेत नट्टू काका यांची भूमिका सकारण्यास मिळाली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांना कॅन्सर असल्याचे समजले. घनशाम हे अचानक शो मधून नाहीसे झालेले त्यांच्या चाहत्यांना कळून आले. तिथुन पुढे त्यांचे कॅन्सरचे उपचार सुरु झाले. गेल्या वर्षी सेप्टेंबर मध्ये त्यांच्या घशातुन कॅन्सरच्या ८ गाठी काढण्यात आल्या त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अशी अपेक्षा होती कि त्यांनी शो मध्ये पुन्हा परतावे. परंतु घनशाम यांची प्रकृति खालावत गेल्याने नट्टू काका शो मध्ये पुन्हा परतु शकले नाही. 


तारक मेहता का उल्टा चशमाची पूर्ण टीम व निर्माते असिम मोदी,तसेच त्यांचे चाहतेही  नट्टू काकांच्या निधनाने भावुक झाले. आज वयाच्या ७७ राव्या वर्षी अखेर घनशाम नायक यांनी जगाचा निरोप घेतला



Related Posts