Lifestyle : दिवाळी म्हणल की सगळीकडे लखलखीत असा प्रकश लाईटीच्या माळा, आकाशकंदील, दिवे, रांगोळी, फाटाके,आणि सगळ्यांचा आवडता फराळ, फराळ म्हणल की चकली, चिवडा, बेसन लाडू, रव्याचे लाडू, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे याचा समावेश होतो
दिवाळी मध्ये प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे फराळ बनवले जाते. फराळ बनवताना आजूबाजूच्या घरातून खमंग असा फराळाचा वास येत असतो फराळाचे हे वेगवेळ्या प्रकारचे असते परंतु फराळामध्ये सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चिवडा, चिवडा हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो, चिवड्या मध्ये काही प्रकार आहे. चला तर पाहूया सविस्तर।...
चिवड्याचे प्रकार:
१. पातळ पोहे
२. जाड पोहे
३. दगडी पोहे
४. लाह्यांचा चिवडा
५. भडंग चिवडा
६. मुरमुऱ्यांचा चिवडा
७. मक्याचा चिवडा
चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
ज्या पोह्यांचा चिवडा बनवायचा असेल तो घ्यावा, अर्धी वाटी शेंगदाणे किंवा फुटाण्याची डाळ, एक वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी काजू, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , तेल, बारीक कापलेले लसून,
पिठीसाखर, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ, लागल्यास चिवडा मसाला,आणि लाल तिखट
सर्व प्रकारचे चिवडे बनवण्यासाठी रेसिपी
१. प्रथम आधी मोठी अशी कढई घ्यावी व ती गॅसवर तापत ठेवा. कढई गरम झाली, की त्यामध्ये जो चिवडा बनवायचा आहे ते पोहे टाकून घ्यावे आणि अगदी मंच गॅसवर पोहे कुरकुर असे फुलून येत नाही तोपर्यंत भाजून घ्या. पोहे जास्त असतील, तर 2 वेळेस भाजून घ्या.
२. यानंतर पोहे एका मोठ्या आशा भांड्यात किंवा मोठ्या पातेल्यात काढून घ्या.
३.प्रथम कढईत पुरेसे असें तेल टाका. तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यात फुटण्याची डाळ टाकून टाळून घ्या
४. यानंतर शेंगदाणे आणि काजू टाकून मंद गॅस वर तळावे नाहीतर ते करपण्याची शक्यता असते व्यवस्थीत तळून घ्या नंतर खोबऱ्याचे काप टाकून तेलात तळून घ्यावे व गॅस मंदच ठेवावा
५. खोबरे परतल्यावर कढईतून शेंगदाणे,काजू,खोबरे, डाळ काढून घ्यावे
६. आता या तेलातच मोहरी टाकून फोडणी होऊ द्यावी. फोडणी झाल्यावर कढीपत्त्याची पाने टाकावी. कढीपत्त्याची पाने चांगली तडतडली की, त्यानंतरच त्यात हळद, लसूण, हिरव्या मिरच्या टाका.व आधी तळून घेतलेले सर्व शेंगदाणे,खोबरे,डाळ,काजू एकत्र करावे
७ सर्व पदार्थ एकत्र केल्या नंतर चिवड्या मध्ये एकत्र करून घ्यावा व हलक्या हाताने मिक्स करून मंद गॅस वर पुन्हा भाजावा
८. झाला का मग पोह्यांचा मस्त, खुसखशीत, खमंग चिवडा झाला तयार चला मग खाऊन पाहूया
चिवडा हा दिवाळीच्या सणाला करतात असे कधीतरी खाण्यासाठी देखील हा योग्य आहे. वरील दिलेल्या चिवड्यांपैकी कोणताही चिवडा आपण सहन सोप्या असा रेसिपीने बनवू शकतो रेसिपी एवढी सोपी आहे, की तुम्ही जर पहिल्यांदाच चिवडा बनवत असाल तर अगदी झटपट असा चिवडा बनवू शकता, चिवडा बनवायचा असेल, तर काही काही पदार्थ असणे अतिशय गरजेचे आहे. नाहीतर बऱ्याचवेळा नेमका चिवडा बनवायच्या टायमिंगला आठवते काही गोष्टी नाहीत आणि चिवडा बनवताना प्रथम ज्याचा चिवडा बनवायचा असेल तो चिवडा मंद गॅस वर भाजून घ्यावा उदारणार्थ पातळ पोहयांचा किंवा दगडी पोहण्याचा चिवडा बनवायचा असेल तर तो पहिला व्यवस्थित निवडून चालून तो मंद गॅसवर असा भाजावा चिवडा नाहीतर मग पोहे कुरकुरीत लागतच नाहीत. तर काही बऱ्याचवेळा नेमके पोहे करपून तरी बसतात किंवा मग पोहे कुरकुरीत लागतच नाहीत.म्हणून मंद अशा गॅसवर पोहे कुरकुरीत होत नाही तोवर भाजून घ्यावे मग गॅस बंद करून घ्यावा