रणवीर सिंगचे "सूर्यवंशी" चित्रपटातील रोल कट करणार रोहित शेट्टी | का ते वाचा सविस्तर...

ranvir singh rohit shetti


Entertainment : रणवीर सिंगचा (Ranvir Singh) 'द बिग पिक्चर' (The Big Picture) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात सर्वसामान्य ते सेलिब्रेटी दिसून येतात. या आठवड्याच्या अगळ्या वेगळ्या भागात रोहित शेट्टी (Rohit Shetty) 'द बिग पिक्चर'च्या दिवाळीच्या अनोख्या सीनमध्ये दिसणार आहे. रणवीर सिंगने सुत्रासंचलीत केलेल्या या शोमध्ये चित्रपट निर्माते अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या चित्रपटाची प्रमोशन करताना दिसतील. या चित्रपटात रणवीरची भूमिका आहे. कलर्स टीवी ने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर 'द बिग पिक्चर'चा प्रमोशन व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी एका चौकशीच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने रणवीरला कळवले की जर, मी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले नाही तर माझी प्रतिष्टा पणाला लागू शकते. पडद्यावरच्या प्रश्नानाकडे लक्ष वेधून रोहित रणवीरला म्हणाला, "यार ये वाला नहीं आया, तो बहुत बेय्जती हो जायेगी." रणवीर हसला आणि म्हणाला, 'ठीक आहे, हा अपमान होईल. त्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर देण्याची गरज आहे.



रोहित म्हणतो, 'तू माझ्यावर प्रेशर आणत आहेस. दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरला मदत मागितली, 'तू मदत करणार नाहीस का ?' एंटरटेनर मदत करत नाही आणि तसे करण्यास त्याला परवानगीही नाही. असे सांगून रणवीर सिंग ने रोहित शेट्टी ला सरळ नकार कळविला.जर रणवीर ने मला आता मदत केली नाहींतर मी त्याला माझ्या आगामी चित्रपटातून काढून टाकेल असे सुनावले. रोहित म्हणतो, "हे पहा,'सूर्यवंशी' हा चित्रपट काही दिवसानवर येऊन ठेपला आहे. तो अजून रिलीज झालेला नाही" या वर रणवीर त्याला मजेत नाही, नाही, नाही, सांगतो व शांत होण्यास भाग पडतो. हा एक मजेदार प्रसंग पाहून प्रेक्षक खूप हेरान होतात आणि सेट वर एक हास्य कलोळ वातावरण तयार होते. 'सूर्यवंशी' हा एक पोलिसांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. तरी या कार्यक्रमासाठी पोलीस सेटवर प्रेक्षकांसोबत असल्याचे हि आपल्याला पाहायला मिळाले. 

 

या आधीही रोहित शेट्टीनी पोलिसांवर आधारित तीन चित्रपट बनवले आहेत. 'सिंघम' (2011) आणि 'सिंघम रिटर्न्स' (2014) त्यात अजय देवघन आपल्याला महत्वाच्या भूमिकेत दिसून आले. तर पुन्हा रणवीर सिंघ सोबत "सिम्बा" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सूर्यवंशी' हा रोहित शेट्टी याचा चौथा चित्रपट आहे. यात अक्षय मुख्य भूमेकेत दिसेल जो अक्षयला पोलिस अधिकारी म्हणून एक नवीन ओळख देऊन जाईल.


Read More :

Related Posts