OMG 2 : Oh My God !
Entertainment : अभिनेता अक्षय कुमार या आधी 'ओह माय गॉड' या चित्रपटातून आपल्या भेटीला आला होता त्यात त्याने 'श्री भगवान कृष्ण' ची भूकिका साकारून प्रेक्षांच्या मनात घर केले होते. जेव्हा भूकंपाने नास्तिक कांजीलाल यांचे पुरातन वस्तूंचे दुकान उद्ध्वस्त होते तेंव्हा ते देवावर दावा ठोकण्याचा निर्णय घेतात. तथापि, तेव्हा भगवान कृष्ण त्याला खटला लढण्यास मदत करतात आणि भ्रष्ट चार्लटन्सचा पर्दाफाश करतात तेव्हा त्याचा विश्वास पुनर्संचयित होतो. असे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाले होते.
अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपटात चक्क 'ओह माय गॉड २ ' ( OMG 2 ) मध्ये भगवान शिव च्या भूमुकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी मोहम्मद झिशान आयुबने 'तांडव' या वेबसीरिजमध्ये भगवान शिवची भूमिका केली होती. त्याच्या या भूमुकेमुळे आणि त्यतील काही डायलॉग मुळे 'तांडव' हि वेबसीरीज खूप चर्चेचा विषय बनली होती. त्या वादानंतर भगवान शिव ची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्याची हि दुसरी वेळ आहे.
'ओह माय गॉड २' चे बहुप्रतिक्षित शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटाचा एक बॅनर देखील वितरित करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार भगवान शिव च्या वेशात दिसत आहे. अक्षय कुमार सध्या खूप व्यस्थ आहे. त्याचे 5 चित्रपट वितरित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही चित्रपटांचे चित्रीकरण मोठ्या स्पीड मध्ये सुरू झाले आहे.
अशा प्रकारे, येत्या काही महिन्यांत, बॉलीवूड सिनेजगतात अक्षय कुमारचे ५ हून अधिक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत . 'बेलबॉटम' आणि 'लक्ष्मी'चे आफ्टर इफेक्ट हे त्याच्या साठी काही सकारात्मक राहिले नाही. त्यामुळे अक्षयला त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेश्या आहेत आणि हे असणे स्वाभाविक आहे असे अक्षय ला वाटते.
Read More :
- Shivani Baokar 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !
- Milk : जाणून घ्या दुधाचे अद्भुत असे फायदे , वाचा सविस्तर