Shivani Baokar 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला !

Shivani Baokar


 Entertainment : प्रेक्षकांच्या आवडती शितल म्हणजेच शिवानी बोरकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे, सोनी मराठीवरील 'कुसुम' या मालिकेतून ती पुन्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'असत्याल लय मनमौजी पण लाखात एक माझा फौजी' असे म्हणत प्रेक्षकांच्या मानत घर करणारी शितल 'कुसुम' या मालिकेतून पुन्हा आपल्या भेटीला येणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.



तिने या मालिकेबद्दल मराठी चावडी कट्टा सोबत केलेली खास चर्चा.

आज वर आपण शिवानी बोरकर हिला शितल या भूमिकेतून भेटलो आहोत व तिने ती भूमिका चांगल्या प्रकारे निभावून आपल्या मनात घर केले आहे. पण शितल आणि कुसुम  या दोन्हीं भूमुकेत काय समानता आणि विरोधाभास आहे ? शिवानी बोरकर हिला आपण गावात राहणारी डॅशिंग मुलगी म्हणून ओळखतो , पण कुसुम या मालिकेत ती आपल्याला या उलट भूमिकेत म्हणजेच मुंबईत वाढलेली व स्ट्रेट फॉरवर्ड असणारी, जी आधुनिक जमान्याची मुलगी आहे व तिला स्वतः ची मते आहेत.


पण ,शिवानी बोरकर प्रत्यक्षात कशी आहे ? कुसुम कि शितल !

आपल्याला तिला कसे पाहायला आवडेल ? पण खर तर शिवानी खरोखर हि शिवानी सारखीच आहे. अभिनेत्री म्हणून काम करत असताना प्रत्येक भूमिका आपल्याला काहीना काही शिकून जातात . पण हा मनोरंजनाचा भाग असला तरी प्रत्येक मुलीला एकदा तरी कुसुम होऊ शी वाटेल आपल्या माणसांची जबाबदारी घेणे प्रत्येक मुलीच स्वप्न असते. आपल्या आई वडिलानसाठी किती हि केले तरी ते कमीच आहे.


तुमच्या अभिनयाबरोबरच तुमच्या फोटोशूटची अतिरिक्त चर्चा हि नेटकर्यान मध्ये असे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?

मी वेब-आधारित मीडिया Update ठेवण्याचा खरोखर प्रयत्न करते. यामुळे माझे काम प्रेक्षकान परियंत पोहते. मालिकेचे चित्रीकरणामुळे वेळ मिळो ना मिळो पण मी हे आठवणी ने करते. कारण एक अक्टर म्हणून यातून मला माझ्या प्रेक्षकांची संवाद साधता येतो.


सध्या मालिकेच्या चित्रीकरणामुळे सतत कलाकार घरापासून लांब असतात त्या बदल काय सांगशील ?

सध्या मालिकेचे चित्रीकरण घरा पासून जवळ असल्यामुळे मला घरी जाता येते. रोज घरच्यांना तसेच आई वडिलांना भेटता येते . पण सणावारांना मी काही गोष्ठी खूप मिस करते थोड्याच दिवसावर दिवाळी आली आहे घरात साफ-सफाई तसेच फराळाची धामधूम असते पण या चित्रीकरणामुळे या गोष्टी मी खूप मिस करेल. मालिका सेट वरील वातावरण सुधा खूप मस्त आहे इथेही आम्ही खूप मजा मस्ती करत असतो.


दिवाळी मुहूर्तावर विशेष तू तुझ्या फॅनस ला काय शुभेच्या देशील ?

या क्षणी कोरोना गेला नाही तरी काळजी घ्या, सुरक्षित रहा, दिवाळी सुरक्षित  साजरी करा आणि आमच्या मालिकेला भरभरून प्रतीसाध व  प्रेम द्या .


Read More :


Related Posts