Milk : जाणून घ्या दुधाचे अद्भुत असे फायदे , वाचा सविस्तर

milk


Lifestyle : आपल्या या दगदगत्या धावपळीच्या जीवनात रोज  अतिशय पौष्टिक असा आहार घेतला पाहिजे कारण शरीराला व्यायाम,तसेच रोजच्या आहारात दूध घेणे गरजेचे आहे. दूधामध्ये बहुतेक प्रकारचे पोषक व पौष्टिक आहार आहेत. दूध घेणे अतिशय महत्वाचे आहे त्यातून मिळणारे प्रथिने कार्ब आरोग्याला फायदेशीर व आरोग्यदायी आहे. 


दुधाचे देखील अनेक प्रकार आहेत, प्रकार म्हणजे दूध हे गाईचे, म्हशीचे, शेळीचे, गाढवाचे, मेंढीचे,तसेच उंटाचे देखील असते हे दूध काही लोक त्यांच्या रोजच्या आहारात वापरतात व त्याचे सेवन करतात आपल्या भारतात गाय व म्हशीच्या दुधाला पाहिले प्राधान्य देतात. गाय व म्हशीच्या दूधामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य लाभदायी प्रथिने आहेत.( Cow milk and buffalo milk ) 


भारतीय लोक गाय किंवा म्हशीच्या दूधाला जास्त पसंदी देत असल्यामुळे काही भारतीय हा देखील विचार करतात की आपल्या परिवाराच्या आरोग्यसाठी नेमके कोणते दूध घेतले पाहिजे गाय की म्हशीचे दूध जेणे करून ते दूध आरोग्यासाठी लाभदायी ठरेल. 


* गाय व म्हशीच्या दुधातील फरक जाणून घ्या सविस्तर. 

१. गाईचे दूध: 

गाईचे दूध हे फार आरोग्यदायी असते पचायला हलके त्यामुळे डॉक्टर देखील लहान मुलांच्या आहारामध्ये गाईचे दूध देण्याचे सल्ले देतात.गाईच्या दूधामध्ये काही घटक पदार्थ असतात त्यामुळे बाळाला गाईचे दूध हे अतिशय चांगले असते. गाईच्या दूधात पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणजे गाईचे दूध हे थराला पातळ असते परंतु पौष्टिक असते गाईच्या दूध आवडत नसल्यास त्याचे सेवन हे आपण अनेक प्रकारे करू शकतो गाईच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवू शकतो. उदरणार्थ: दही, ताक, तूप, लस्सी, आईस्क्रीम, आशा अनेक पदार्थातून दूधाचे सेवन करता येते. 

गाईच्या दुधात चरबीचे प्रमाण हे ३ ते ४ टक्के असते तर एका कप गाईच्या दुधात 148 कॅलरीज असतात. गाईच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात परंतु काही कमी प्रमाणात असतात गाईच्या दूधात चरबीचे प्रमाण असते त्यामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तींच्या आरोग्याला फायदेशीर असते.



२.म्हशीचे दूध:

म्हशीच्या दुधात देखील अनेक प्रकारच्या कॅलरीज असतात आरोग्ययुक्त प्रथिने असल्या कारण काही लोक म्हशीच्या दुधाचे खाण्यात सेवन करतात. म्हशीचे दूध हे थराला घट्ट व चरबीयुक्त असते तसेच काही आजारानंसाठी उपयुक्त असे म्हशीचे दूध आहे म्हशीच्या दुधाचे देखील अनेक प्रकारे आपण सेवन करू शकतो उदरणार्थ: दही, ताक, तूप, लस्सी, आईस्क्रीम,मलई रबडी,रसगुल्ले, किंवा खीर आशा अनेक पदार्थातून म्हशीच्या दुधाचे करता येते.

म्हशीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात तसेच म्हशीच्या दुधामध्ये १० ते ११ टक्के अधिक कॅल्शियम असते.म्हशीच्या दुधामध्ये जास्त कॅल्शियमचे प्रमाण असल्या करण लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही. या दुधात चरबीचे प्रमाण देखील जास्त असते गाईच्या दुधापेक्षाही म्हशीच्या दूधामध्ये 7-8- टक्के चरबी असते. तर एका कप म्हशीच्या दुधात 237 कॅलरीज असतात. 


दोन्ही दुधातील फरक बघता असे कळते की, दोन्ही दूध आपल्यासाठी आरोग्याला फायदेशीर आहेत आणि आपल्या गरजेनुसार कोणते दूध प्यावे हे सर्वस्वी स्वतः ठरवू शकता 


( टीप: सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.) 

Read More : 
Related Posts