Yohani : 'माणिके मागे हिते' गायिका दिसणार या चित्रपटात भारतीय अभिनेत्या सोबत | Yohani Manike Mage Hithe

Yohani Manike Mage Hithe


Entertainment : श्रीलंकन ​​सिंगर योहानीची मेलडी 'मणिके मागे हिते'  (Yohani Manike Mage Hithe) गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन माध्यमांद्वारे प्रसिद्ध होताना दिसत आहे. या गाण्याचे काही वेग वेगळ्या बोलीभाषांमध्ये नवीन रिमेक  बनवण्यात आले. या सिंहली सुरातील गाण्याने प्रेक्षकांना आपलसं केल आहे. अनेकांनी आपल्या दूरध्वनी वर आपली रिंगटोन 'मणिके मॅगे हिते' हे गाण ठेवलं आहे. वेब माध्यमान द्वारे या गाण्याला जशी प्रसिद्धी मिळाली लगेच योहानी प्रसिद्धीच्या झोक्यात आली. आपण Google वर Y अक्षर इंग्रजी टाइप केले कि, लगेच योहानी हे नाव आपल्याला पाहायला मिळेते.

सध्या योहानीच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. भूतकाळात योहानीचे महत्त्व त्यांच्या देशापुरते मर्यादित होते. तिचे 'माणिके मागे हिते' हे गाणे खूप वायरल होताच योहानीला जग प्रसिद्धी मिळाली. 

या कामगिरीच्या बळावर योहानी सध्या बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवताना दिसणार आहे.सोशिअल माध्यमा नुसार, इंद्रकुमार दिग्दर्शित आगामी चित्रपट 'थँक गॉड’ यामधून योहानी बॉलीवूड मध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.यात योहानी अजय देवघन सोबत आपल्यला काम करताना दिसणार आहे. तिने पुढील चित्रपटासाठी अजय देवघन तसेच देवाचे आभार मानले.

 


या चित्रपटात आपल्याला 'माणिके मागे हिते' या गाण्याचे हिंदी व्हर्जन ऐकायला मिळणार आहे. खुद्द योहानी हे गाणे आपल्याला हिंदीतून गाताना दिसणार आहे.जेव्हा ही बातमी बाहेर येताच,योहानीच्या प्रत्येक चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट आल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. हा चित्रपट येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यात रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अजय देवगण यांचा समावेश असेल.

या सॉंग चे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. रश्मी विराग यांनी हिंदी गाण्याचे लिखाण केले तसेच गाण्याचे व्हर्जन तनिष्कने संगीतबद्ध केले. या चित्रपटाचे प्रमुख इंद्रकुमार सांगतात की, संगीताचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल. या सिंहली ट्यूनच्या हिंदी व्हर्जणासाठी पूर्ण टीम उत्साही आहे आणि या साठी पूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे.'थँक गॉड' हा कॉमेडी चित्रपट असेल. ज्यामध्ये एक अनोखा संदेश दिला जाईल. हा चित्रपट फक्त सिनेमागृहात प्रदर्शित केला जाईल, असे भूषण कुमार म्हणाले.


निर्माता भूषण कुमार म्हणाले, "सक्षम कलाकार योहानीसोबत काम करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही भारतीय चाहत्यांसाठी 'माणिके मागे  हिते'  हे गाणे आपल्या देसी म्हणजेच हिंदी रुपात आणण्याचा प्रयंत्न करत आहोत. 'थँक गॉड' हा एक फमिली चित्रपट असून आम्ही सगळेच कलाकार खूप उत्साही आहोत.

Read More :

Previous Post
Next Post
Related Posts