बिग बॉस मराठी 3 च्या सीझनमधील स्पर्धक हे 3 महिन्याच्या कालावधीसाठीं एकत्र आलें आहेत. त्यातील पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली
आहेत म्हणून बिग बॉस मराठी 3 हा सीझन सोशल मीडियावर अतिशय चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या घरातील एक व्यक्ती कीर्तनकार शिवलीला पाटील या ट्रोलरच्या खूप नजरेत आहेत. त्यातच शिवलीला पाटील यांचा एक विडिओ अतिशय सोशल मीडिया वर वायरल झाला. त्यामध्यें त्या आजकालच्या महिलांन विषयी बोलताना दिसत आहेत. आजकालच्या महिला पदर मागे, केस मोकळे सोडून वावरतात. कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे बिग बॉस च्या घरातील वागणे आणि त्यांचे महिलांन बद्दल हे वक्तव्य याची तुलना प्रेक्षक करू लागले. लोका सांगे भह्मज्ञान ,स्वतः कोरडे पाषाण असे म्हणून चाहत्यांनी शिवलीला पाटील यांना खूप ट्रोल केले.
शिवलीला पाटील सोबतच बिग बॉस च्या घरातील काही सदस्यांची अतिशय जोरदार चर्चा चालू आहे. त्यात काहींची भांडणे होत आहेत तर काहींची मैत्री होताना दिसत आहे. त्याचबरोबर तृप्ती देसाई, स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार यांची ट्रोलर्समध्ये खूप चर्चा चालू आहे.