हा चित्रपट अति-उत्कृठ अश्या संवादांनी भरलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे . हा एक अक्शन ड्रामा चित्रपट असल्याचे प्रथम धर्शनी वाटतो. यात सलमान खान एका सरदाराच्या पेहराव्यात दिसत आहे तर अभिनेता आयुष गुंडाच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला दिसत आहे . या चित्रपटात मेलोड्रामॅटिक सिक्वेन्स असलायचे दोनी अभिनेत्यांकडून बोलले जात आहे. हे पाहणे आपल्याला कदाचित ताजेतवाने वाटले.
'अंतिम' चित्रपट हा प्रवीण तरडे यांच्या 'मुळशी पॅटर्न' (२०१८) चा रिमक असल्याचं दिसत आहे. यात स्वत: सलमान खान या चित्रपटाचे प्रोडूसर आहेत तर या चित्रपटाचे डायरेक्टर महेश मांजरेकर करत आहेत. तर याचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी केले आहे. सलमान खान यात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत तर त्यांच्या सोबत आयुष शर्मा हा राहुल पाटील म्हणजेच आपल्या राहुल्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. सचिन खेडेकर हे आपल्याला राहुल्याच्या वडिलांचे पात्र साकारताना दिसणार आहेत. तसेच यात आपल्याला महिमा मकवाना , जिस्षु सेनगुप्ता , निकीतीन धीर ,सयजी शिंदे , शरद पोंक्षे ,सचिन खेडेकर, वरून धवन असे दिग्गज कलाकर पाहायला मिळतील. 'विघ्हार्ता' या गाण्यावर वरून धवन आपल्याला मुख्य भूमिकेतून दिसेल.
मराठी शेतकर्यांना भेडसावणारे प्रश्न व त्यांची मुले कसे गुन्हेगारी कडे वळतात हे या चित्रपटात दाखवण्याचा पर्यंत केला आहे. या चित्रपटात एक सरदार पोलीस म्हणजेच सलमान खान आणि एका गुंडाचा म्हणजेच आयुष यांच्यात जोरदार टशन होताना आपल्या पाहायला मिळणार आहे. टीझर मध्ये दिसत आहे कि आयुष चे वडील हे काष्ठानी आपल जीवन व्यथित करण्याच ठरवतात पण गुंड आयुष याच्या मनात वेगळच काही तरी चालू आहे . त्याच्या या विचारांमुळे तो एकावर एक गुन्हे करत जातो नंतर यामुळे त्याला एक सरदार पोलिसाचा सामना करावा लागतो. या मध्ये चित्रपटात काय काय घडतंय हे पाहण्यासारखं राहील. या चित्रपटात अक्शन सोबतच डायलॉग वर जास्त भर दिलेला आपल्याला दिसत आहे त्याच बरोबर आपल्याला सलमान खान यांच्या तोंडून मराठी हि डायलॉग ऐकान्या ची संधी मिळणार आहे. त्यातचं चित्रपटातील काही डायलॉग आताच प्रेक्षकांच्या आवडतीस उतरताना दिसत आहे. हा चित्रपट आपल्याला २६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षणीय स्थळावर पाहायला मिळेल.
Read More :